सत्तरी तालुक्यात उपाययोजना करण्यासंदर्भात विशेष बैठकीत आढावा
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याची यंत्रणा सतर्क झालेली आहे. पावसाळय़ात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष दखल घेऊन शक्मय तेवढय़ा लवकर उपाययोजना करण्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक नुकतीच वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात घेण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून सत्तरीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक वीस दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. त्यानंतर बैठकीचा पाठपुरावा करण्यासाठी दुसरी बैठक नुकतीच झाली. यावेळी डॉ. वैद्यकीय अधिकारी कल्पना महात्मे, आरोग्य अधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर, सत्तरी तालुका डेंग्यू रोगाचे नोडल ऑफिसर डॉ. संकेत फडते, नगराध्यक्ष सेहझीन शेख, नगरसेवक विनोद हळदणकर, वसईउद्दीन शेख, नगरसेविका प्रसन्ना गावस, पालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे
नगरगाव सरपंच प्रशांत मराठे, म्हाऊस सरपंच वंदना गावस, कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, जलसंपदा खात्याचे कनि÷ अभियंता अझीझ शहा आदांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. कल्पना महात्मे यांनी येणाऱया पावसाळय़ामध्ये डेंग्यू रोगावर नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले की बागायतीमध्ये पाण्याचा साठा होणार नाही याची विशेष दखल घेण्यात आल्याचे सांगितले. एकाच ठिकाणी जास्त वेळ पाण्याचा साठा झाला त्यामध्ये मच्छर अंडी घालतात व त्यामधून नवीन मच्छरांची पैदास होत असते. यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचेही गावस यांनी सांगितले
विविध ठिकाणी पाण्याचे वाटप करण्यासाठी बांधण्यात आलेल्या चेंबरमध्ये पाण्याचा साठा सातत्याने होत असतो. मात्र यामध्ये मच्छरांची पैदास होणार नाही याची विशेष दखल जलसंपदा खाते घेणार आहे, असे कनि÷ अभियंता शहा यांनी सांगितले. नगरगाव सरपंच प्रशांत मराठे व म्हाऊस सरपंच वंदना गावस यांनी यावेळी पंचायत क्षेत्रातील विविध ठिकाणी औषधांची फवारणी केल्याची माहिती दिली.
आरोग्य निरीक्षक गजानन पार्सेकर यांनी यावेळी आतापर्यंत हा रोग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून केलेल्या उपक्रमा संदर्भात सविस्तर माहिती दिली. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण आढळून आलेले आहेत तेथे औषधांची फवारणी करण्यात आलेली आहे .प्रत्येक घरापर्यंत या रोगा संदर्भाची जनजागृती करण्यात आल्याचे पार्सेकर यांनी या वेळी बैठकीमध्ये सांगितले
नोडल अधिकारी डॉ. संकेत फडते यांनी यावेळी एकूण केलेल्या उपाययोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली. डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर यांनी यावेळी पावसाळी मोसमामध्ये डेंग्यू त्याचप्रमाणे इतर रोगावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवता येईल याबाबत माहिती दिली.