Tarun Bharat

संजय राऊत यांच्या खटल्याची सुनावणी लांबणीवर

प्रतिनिधी /बेळगाव

प्रक्षोभक भाषण केले म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह चौघांना न्यायालयाने संमन्स बजावले होते. मात्र त्यांच्यासह इतर काहीजण हजर झाले नाहीत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

बेळगावमध्ये 30 मार्च 2018 रोजी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये हे सर्वजण उपस्थित होते. त्यावेळी प्रक्षोभक भाषण केले म्हणून पोलिसांनी तब्बल चार वर्षांनंतर गुन्हा दाखल करून संमन्स बजावला आहे. जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये त्यांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. कामाण्णाचे यांनी वकालत दाखल केली आहे. आता पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

न्यायालयात उपस्थित राहणार अशी शक्मयता होती. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह म. ए. समितीचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

Related Stories

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांचे आंदोलन

Omkar B

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती

Patil_p

गांधी चौक-डेअरी फार्म रस्त्यावर अंधारच

Amit Kulkarni

बेंगळूर : कोविड केअर सेंटरमधील सुमारे ६४ टक्के बेड रिक्त

Archana Banage

पोस्ट ऑफीसतर्फे रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण पुन्हा सुरू

Patil_p

फलोत्पादन विभाग-मनपाकडून लेले ग्राउंडची स्वच्छता

Omkar B