Tarun Bharat

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत सध्या कोठडीत आहेत. त्यांच्या जमीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण राऊतांना कोर्टात पोहचण्यास उशीर झाला. त्यापूर्वी कोर्टाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणीस २७ सप्टेंबर तारीख दिली. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावर सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाती विशेष पीएमएलए कोर्टात आज संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे संजय राऊतांना कोर्टात पोहचण्यास उशिर झाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊतांना दीड तास उशिरा हजर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच संजय राऊतांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबर तारीख देण्यात आली होती. कोर्टाने राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचीही नोंद घेतली आहे.

हे ही वाचा : कधीही चौकशी करा, मात्र आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

१९ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढली. यानंतर संजय राऊतांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी

datta jadhav

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार?

datta jadhav

लोककल्याणकारी सरकार असमानता निर्माण करून भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही : वरुण गांधी

Abhijeet Khandekar

महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी शरद पवार आखाड्यात !

Abhijeet Khandekar

आरक्षण संपुष्टात आणणे हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव – नाना पटोले

Archana Banage

वाई पोलिसांचा तृप्ती लॉजवर छापा

Patil_p