वृत्तसंस्था/ लंडन
28 जुलैपासून सुरु होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या क्रीडाप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. महिलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळविली जाणार असून यासाठी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हिदर नाईटकडे इंग्लंडचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी शनिवारी इंग्लंडच्या महिला निवड क्रिकेट समितीने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. या स्पर्धेसाठी नवोदित क्रिकेटपटू ऍलिसी कॅप्से, प्रेया केम्प, ईसी वाँग या नवोदितांना संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संघात अनुभवी कॅथरेनी ब्रंट, केटी कास, सोफिया डंक्ले आणि सोफी ईक्लेस्टोन यांचा समावेश आहे. ब्रिटनमधील एजबस्टन मैदानावर राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या टी-20 क्रिकेट सामने खेळविले जातील. इंग्लंडचा पहिला सामना 30 जुलैला लंकेबरोबर होणार आहे. त्याचप्रमाणे 21 जुलैपासून सुरु होणाऱया दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघाची निवड जाहीर केली आहे.
इंग्लंड महिला टी-20 क्रिकेट संघ – हिदर नाईट (कर्णधार), मेई बाऊचर, कॅथरेनी ब्रंट, ऍलिसी कॅप्से, केट क्रॉस, प्रेया डेव्हिस, डंक्ले, सोफि इक्लेस्टोन, सारा ग्लेन, ऍमीजोन्स, प्रेया केंप, स्किव्हेर, ब्रियोनी स्मिथ, वाँग आणि डॅनी वेट.