Tarun Bharat

मनपा मंडळाच्या बैठकीत रस्त्यांच्या दुर्दशेवर जोरदार चर्चा

संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कारवाईची मागणी

प्रतिनिधी /पणजी

पणजी महापालिका मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पणजीतील रस्त्यांच्या दुर्दशेवर जोरदार चर्चा झाली आणि बैठकीत संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी झाली.

पणजी महापालिका बैठकीत माजी महापौर उदय मडकईकर यांनी पणजीतील रस्त्यांची चाळण झाली त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सदर बैठकीत कित्येक नगरसेवकांनी आपले विचार मांडले. अखेरीस एका ठरावाद्वारे सदर रस्त्यांचे कंत्राट ज्यांना देण्यात आले त्या चारही कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौऱयाचे निमित्त साधून ज्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले त्यांना पुढील पाच वर्षे कोणतेही कंत्राट देण्यावर बंदी घालण्यात यावी, असा ठराव महापालिका बैठकीत संमत करण्यात आला.

या ठरावामध्ये या संपूर्ण प्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशी क्हावी. संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी केली.

Related Stories

अमित शहांनी गोमंतकियांची माफी मागावी : काँग्रेस

Abhijeet Khandekar

धारबांदोडा क्षेत्रात लंपी व्हायरग्रस्त गुरे आढळल्याचा संशय

Omkar B

कोलवाळातील कैदी संपावर

tarunbharat

पंचायत प्रभाग फेररचना स्थगित ठेवावी : काँग्रेस

Amit Kulkarni

केरी सत्तरीत पक्षी निरीक्षणातून चेतन पारोडकर यांच्या स्मृतींना उजाळा

Amit Kulkarni

निर्मला सीतारामण 11 रोजी गोव्यात

Amit Kulkarni