Tarun Bharat

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर, धरण ८० टक्के भरले

धरणातून १६०० क्यूसेकने विसर्ग सुरू

राधानगरी/प्रतिनिधी

पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. संतधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघही वाढला असून धरण ८० टक्के भरले आहे.
रविवारी सकाळी 8 वाजता पाणी पातळी ३३८.०३ इतकी आहे,धरणातून ६०० क्यूसेक वरून १६०० क्यूसेक विसर्ग वाढवल्याने पुन्हा भोगावती नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे, सद्या पाणी साठा ६६६८.७३ द ल घ फूट (६.४९ टीएमसी) इतकी आहे. दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, आतापर्यंत २४१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related Stories

विधानपरिषद रणधुमाळी : पालकमंत्री सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टींच्या भेटीला

Abhijeet Khandekar

पीकअप गाडीने चिरडून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार

Archana Banage

मलकापुरात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याच्या पुतळ्याचे दहन

Abhijeet Khandekar

शिवभोजन थाळीला `जीएसटी’चा कट

Archana Banage

घरबसल्या करा विवाह नोंदणी!

Archana Banage

कोल्हापूर : शिरगावात अर्भक सापडल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा

Archana Banage