पुणे / प्रतिनिधी :
Heavy rain forecast in Konkan, Madhya Maharashtra कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्हय़ाला आज (बुधवार) मुसळधार पावसाचा अर्थात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारीही कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील न्यून दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. तसेच हे क्षेत्र पश्चिम उद्रार पश्चिमेकडे सरकत असून, बुधवारी ते मध्य प्रदेश व लगतच्या भागावर आहे. याच्या प्रभावामुळे मंगळवारी विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला, तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर, सातारा, पुण्याच्या घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. भुधवारी तसेच गुरुवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत ऑरेंज अलर्ट आहे.
आज (बुधवार) ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे सातारा, कोल्हापूर
यलो अलर्ट
ठाणे, सिंधुदुर्ग
उद्या (गुरुवार) ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
पालघर, ठाणे, रायगड, पुणे
यलो अलर्ट
नंदुरबार, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा