नद्या नाले तुडुंब. अंजुणे धरण फुल्ल. चारही दारे खुली. डिचोली व साखळीतील नद्यांच्या पातळीत वाढ. जनजीवन विस्कळीत.
डिचोली/प्रतिनिधी
गेल्या तीन चार दिवसांत पडत असलेल्या पावसाने काल सोमवारी सकाळपासूनच जोर धरल्याने तालुक्मयातील सर्व नद्या नाले तुडुंब झाले. दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने डिचोली साखळीत जनजीवन विस्कळीत झाले. केरी येथील अंजुणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातील अतिरिक्त पाणी सततपणे समोरील नदीत सोडचे सुरूच आहे. त्यामुळे साखळीतील वाळवंटी नदीची पातळी बरीच वाढली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणात होती. डोंगरमाथ्यावर जोरदार पावसाची वृष्टी झाल्याने साखळी व डिचोलीतील नद्यांची पातळी वाढली आहे.
गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने काल सोमवारी रौद्ररूप धारण केले. दिवसभर तालुक्मयातील जोरदार वृष्टी झाली. या जोरदार पावसामुळे डिचोली तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत झाले. गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने लोकांना काही प्रमाणात सवय झाली होती. मात्र आता पाऊस सततपणे पडू लागल्याने लोक पावसाची तयारी करूनच बाहेर पडत आहेत. परंतु काल सोमवारी पावसाने रौद्ररूप धारण केल्याने त्याचा फटका लोकांना सहन करावा लागला.
या जोरदार पावसाचा साखळी बाजारावर परिणाम झाला. याचा फटका व्यापाऱयांना बसलाच, पण विपेत्यांनाही त्रास सहन करावे लागले.
साखळी नदी व नाल्यातील पाण्याची पातळी वाढली
या पावसामुळे साखळीतील वाळवंटी नदीतील पाण्याची पातळी किंचित वाढली होती. तसेच बाजारातील नाल्यातही पाणी वाढल्याने संध्याकाळी पंप सुरू करून आतील पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. नदी व नाल्याची पातळी अडीच मीटर इतकी होती. नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नाल्यांची पाणी पातळी वाढली होती. सर्वत्र पाणी साचून रहिल्याने पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती.
साखळीत 101 इंच पावसाची नोंद. सोमवारी 2 इंच पाऊस
साखळी परिसरात या मोसमात पडलेला पाऊस 101 इंच नोंद झाला आहे. तर सोमवारी दिवसभर 2 इंच पाऊस पडला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून साखळीत समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवतीलाच साखळीतील पावसाने शतक गाठले आहे.
(ँर्दे) अंजुणे धरण फुल्ल, चारही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग
उत्तर गोव्यातील अत्यंत महत्त्वाचे केरी सत्तरीतील अंजुणे धरणातील पाण्याने पूर्ण क्षमतेने पातळी गाठली आहे. या धरणाची एकूण क्षमता 93.30 मीटर इतकी आहे. सोम. दि. 12 रोजी संध्याकाळपर्यंत या धरणातील पाण्याने 93.26 मीटर इतकी पातळी गाठली आहे. त्यामुळे या धरणातील पाणी 15 सेंटीमीटर दरवाजा उघडून समोरच्या नदीत सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. धरण परिसरात आतापर्यंत 119 इंच पावसाची नोंद झाली आहे. संध्याकाळी नदीला ओहोटी असल्याने पाणी सोडणे सुरूच ठेवण्यात आले होते. त्यामुळे तसेच डोंगरमाथ्यावर विर्डी महाराष्ट्र भागात जोरदार पाऊस पडल्याने साखळीतील वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. रात्री उशिरापर्यंत साखळीतील नदीची पातळी वाढलेलीच होती.
डिचोली परिसरातही जोरदार पावसाचा मारा
डिचोलीतही पाऊस जोरदार पडल्याने डिचोलीतील नदीची पातळी वाढली होती. नदीतील पाणी पातळी वाढल्याने परिसरातील नाल्यांमध्ये पाणी वाढले होते. त्यामुळे नदीपरिसरात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. साळ गावतीलही शापोरा नदीत पाणी वाढले होते. परंतु डिचोली व साळ येथील पुरस्थिती नियंत्रणात असल्याचे जलस्रोत खात्याचे कनि÷ अभियंता विनोद भंडारी यांनी दिली.