Tarun Bharat

Kolhapur Rain: पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Kolhapur Rain Update : गेल्या पंधरा दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आज सायंकाळपासून कोल्हापुरात पावसाने जोर धरला. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानं पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

पावसाने अचानक दडी मारल्याने भात पिक वाळणीला लागले होते. यामुळे शेतकरी चिंतेत होता. तर गेल्या चार दिवसांपासून वातावरणात उष्मा खूप होता. पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर अचानक पाऊस आल्याने नागरीकांची काहीकाळ धांदल उडाली.

Related Stories

चंदूरात एका दिवसात 13 पॉझिटिव्ह,तर एक म्युकर मायकोसिस रुग्ण

Archana Banage

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर

datta jadhav

बेळगावच्या शाळकरी मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये अत्याचार

mithun mane

डॉ.अर्थवने घेतली ‘हायरेंज रेकॉर्ड’झेप..!

Archana Banage

”लॉकडाऊनबाबत राज्य सरकार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता”

Archana Banage