Tarun Bharat

राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाचा अंदाज

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यभरात पावसाने मागील आठवड्यात जोरदार बॅटिंग केल्यांनतर काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या पावसाने गेल्या पाच-सहा दिवसांपासून उसंत घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. मात्र, हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मागील आठवड्यात पावसाने राज्यभरात जोरदार बॅटींग केली. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या पावसाने गेल्या दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या उन-पावसाचा खेळ सुरू आहे. मात्र असे असले तरी हवामान विभागाकडून राज्यभरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heavy rainfall alert in maharashtra for next four days prediction of imd)

हे ही वाचा : गद्दारांची प्रश्न विचारायची लायकी नसते, आदित्य ठाकरेंचा आमदार कांदेंवर घणाघात

हवामान विभागाच्या अंदाजनुसार राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे. शनिवार २३ जुलैपासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. शिवाय, राज्याच्या मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. शिवाय, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं आहे. मात्र, गुरूवारपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी आला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे.

Related Stories

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस

Archana Banage

रायगडावर पाच लाख शिवभक्तांच्या उपस्थित होणार शिवराज्याभिषेक

Rahul Gadkar

महाआरतीला गैरहजर राहिलेल्या राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला ‘हा’ सल्ला

datta jadhav

मुंबईत मुसळधार पावसाने प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत साचले पाणी

Tousif Mujawar

जवानांना रजेवर जाताना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सेवा

datta jadhav

कोरोना युद्धासाठी एशियन बँकेचे भारताला1.5 अज्ब डॉलर्सचे कर्ज

Patil_p