Tarun Bharat

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी; धरणातून ९४४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी चालू असल्याने, धरणातून सुरु असलेल्या ६८७५ क्युसेक विसर्गा मध्ये वाढ करून विद्युत गृहातून १६६४ क्युसेक व वक्रद्वार मधून ७७८४ क्युसेक, असे एकूण ९४४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

शिराळा तालुक्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे यामुळे आज बुधवार दि. १० रोजी सकाळी ८ च्या दरम्यान विद्युत गृहातून १६६४ क्युसेक व वक्रद्वार दरवाजा मधून ७७८४ क्युसेक, असा एकूण ९४४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत होत असल्याचे सहायक अभियंता एम.एम. किटवाडकर यांनी सांगितले. तसेच नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज सकाळी ऐतवडे खुर्द येथील वारण नदीचा पूल पाण्याखाली गेला असून चिकुर्डे, काखे, मांगले येथील छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Related Stories

सांगली : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजाने देणार

Abhijeet Shinde

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, पणनमंत्र्यांचे आदेश

Abhijeet Shinde

सांगलीत होड्यांच्या शर्यतीचा थरार अन् अचानक नदीत बोट उलटली; व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Khandekar

सांगली : त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू; पोलिसांकडून संचलन

Sumit Tambekar

सांगली : राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन कायद्याचा भंग

Abhijeet Shinde

मिरजेत यंदा रामजन्माचा पाळणा रंगलाच नाही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!