Tarun Bharat

जिल्ह्यात पावसाचे थैमान

अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृश्य पाऊस : बहुतांशी भागातील वीजपुरवठा खंडीत : आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहणार कायम

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. बुधवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळी 6 नंतर मात्र कोल्हापूर शहरासह जिह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह झालेल्या अतिवृष्टीमुळे वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला. शहरातील सखल भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राफ्त झाले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 14 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. राधानगरी धरणातून 800 क्युसेक जलविसर्ग सुरु असून 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगफुटीसदृष्य परतीचा पाऊस सुरु आहे. बुधवारी दुपारनंतर काळे ढग दाटून आले आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरुच होता. त्यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत होते. पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली.

हे ही वाचा : शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रांची कोल्हापुरात पडताळणी

या पावसामुळे शेतीचेही मोठ्य़ाप्रमाणात नुकसान झाले असून भात, सोयाबिन, भुईमूग आदी पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. संततधार पावसामुळे शेतीकामेही खोळंबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शहरातील सखल भागास तळ्याचे स्वरूप
बुधवारी सायंकाळी सलग दोन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे व्हिनस कॉर्नर, लक्षीपुरी व्यापारपेठ, सीपीआर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, परिख पूल, राजारामपूरी जनता बझार चौक आदी शहरातील सखल भागात तळ्याचे स्वरूप प्राफ्त झाले होते. हातकंगले, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर इतरत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस

तालुका पाऊस (मि.मी. मध्ये)

हातकणंगले 46.7
शिरोळ 12.2
पन्हाळा 47.3
शाहूवाडी 38.8
राधानगरी 20.5
गगनबावडा 66.7
करवीर 50
कागल 20.2
गडहिंग्लज 8.4
भुदरगड 15.8
आजरा 6.1
चंदगड 2.6

एकूण 28.3

Related Stories

पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे साऱया देशाचे लक्ष

Patil_p

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Archana Banage

प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ; 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत

Tousif Mujawar

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ला 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवाणगी

Tousif Mujawar

महापालिकेच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब, एकही हरकत दाखल नाही

Rahul Gadkar

कर्जासाठी पाकिस्तानवर जिन्नांचे पार्क गहाण ठेवण्याची वेळ

datta jadhav