Tarun Bharat

राज्यात जोरदार पाऊस

Advertisements

29 पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात येत्या दि. 29 जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात सर्वत्र जोरादर पाऊस पडला. केपे तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तेथे गेल्या 24 तासात 6.5 इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद केपे तालुक्यात झाली आहे. 

गेल्या  24 तासात राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली. मडगावात 4 इंच, मुरगाव 3.5 इंच, धारबांदोडा व जुने गोवे येते प्रत्येकी 3 इंच, पणजी, सांगे, फ्ढाsंडा येथे प्रत्येकी 2.5 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. म्हापसा, काणकोण, सांखळी येथे प्रत्येकी 2 इंच तर वाळपईत 1.5 इंच व पेडणे येथे 1.15 इंच एवढी पावसाची नोंद झाली. आगामी 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Related Stories

वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थानचा आज वार्षीक पिंडीकोत्सव

Amit Kulkarni

केरी सत्तरी येथे घरातील सिलिंडरला आग.

Omkar B

मेस्तावाडा वास्कोत घरावर माड कोसळून हानी

Amit Kulkarni

कोरोना संसर्गामुळे वास्कोतील शहर आरोग्य केंद्र अडचणीत, 34 पैकी 24 कर्मचाऱ्यांना लागण

tarunbharat

करमल घाटात ट्रक मातीत रूतून बंद पडला : 5 तास वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

कोरोना : 215 बाधित, 7 बळी

Amit Kulkarni
error: Content is protected !!