ऑनलाइन स्वस्तात खरेदी केले जुने हेलिकॉप्टर
ब्लेक मॉरिस आणि मॅगी मॉर्टन या जोडप्याने एका जुन्या आणि सेवेतून निवृत्त हेलिकॉप्टरला ऑनलाइन विक्रीसाठी पाहून ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या हेलिकॉप्टरवर काहीशी मेहनत आणि पैसे खर्च केल्यावर या जोडप्याने याला उत्तम कँप हाउसमध्ये रुपातंरित केले आहे. युएस कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर पायलट राहिलेल्या जोडप्याला विमानांची चांगली माहिती होती. त्यांनी या माहितीचा वापर या अनोख्या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
अमेरिकेत राहणाऱया वैमानिक जोडप्याने फेसबुक मार्केटप्लेसवर या निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरला पाहिले होते. त्यांना हे हेलिकॉप्टर फॅमिली हॉलिडेसाठी योग्य वाटले. मॉरिस यांच्यानुसार हे हेलिकॉप्टर पूर्वी जर्मन पोलिसांकडे होते. तेथून ते अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्याकडे काही वर्षांपर्यंत राहिले आणि 2011 मध्ये अमेरिकेत दाखल झाले. हेलिकॉप्टरचा ताबा मिळविल्यावर मॉरिस यांनी याला कँपरमध्ये बदलण्याचा पूर्ण आराखडाच तयार केला.
मॅगी या त्यांच्या जोडीदाराने देखील मॉरिस यांना याप्रकरणी पूर्ण मदत केली. जोडप्याने स्वतःच्या हेलिकॉप्टरला हेलिकँपररमध्ये रुपांतरित करण्याची पूर्ण प्रक्रिया रिकॉर्ड केली आणि ते सोशल मीडियाद्वारे याला ते लोकांपर्यंत पोहोचवत राहिले. भंगारापासून याला वास्तव्ययोग्य करण्याची प्रक्रिया सोपी नव्हती.
हेलिकँपरमध्ये आता कँप स्टेसाठी आवश्यक सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत. आउटडोअर स्पीकर, आउटडोअर टीव्ही हुकअप, केबल हुकअप सर्वकाही उत्तमप्रकारे तयार करण्यात आले आहे. याच्या आतमध्ये एक चिकन देखील असून तेथे स्वयंपाक करताना टीव्ही पाहता येतो.
अल्बामा येथे राहणाऱया मॉरिस आणि मॅगी यांनी इन्स्टाग्राम अकौंटवर याची अनेक छायाचित्रे अपलोड केली आहेत. टॉयलेट, बाथरुमपासून कँपिंगसाठी आवश्यक सर्व सुविधा या हेलिकँपरमध्ये आहेत. मॉरिस आणि मॅगी स्वतःच्या या नव्या प्रयोगाबद्दल अत्यंत आनंदी असून त्यांना लोकांकडून देखील चांगला फीडबॅक मिळत आहे.