तरुण भारत

रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळले, 2 पायलटचा दुदैवी मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावर गुरुवारी रात्री सरकारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन पायलटचा मृत्यू झाला असून, तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (helicopter crash at raipur airport 2 pilots dead)

Advertisements

मिळालेल्या वृत्तानुसार, रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावर रात्री 9.10 च्या सुमारास लँडिंग करताना सरकारी हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर जमिनीवर वेगात आदळल्याने हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेले पायलट ईपी श्रीवास्तव आणि कॅप्टन पांडा हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री उशिरापर्यंत हेलिकॉप्टरचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू होतं. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर रायपूर राज्य सरकारचं असून, नियमित सरावाच्या वेळी ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघातामुळे रायपूर विमानतळावरील नियमित उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विमानतळ संचालकांकडून सांगण्यात येते.

Related Stories

जबरदस्ती धर्मांतर केल्यास ‘रासुका’; संपत्तीही होणार जप्त

datta jadhav

लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतात? शेअर केला व्हिडिओ

prashant_c

देशात 2.11 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

datta jadhav

नोएडा : ओप्पो कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Rohan_P

बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता 1500 कोटींची तरतूद

Patil_p

“मौका सभी को मिलता है,” – नितेश राणेंचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!