Tarun Bharat

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास नेमक कशामुळे होतो?

जास्त वेळ उभे राहिल्याने वा बसल्याने शीरांमध्ये ताण निर्माण होतो व पडदे निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अधिक रक्त जमा झाल्यामुळे शीरा फुगतात व व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास उद्भवतो.
पाय सुजणे, संध्याकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा पाय फार दुखतोय् असे आपल्याला जाणवते. पण फार थकलोय् असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही कारणे घेऊन डॉक्टरांकडे जाणाऱ्या निम्म्या लोकांना व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास असल्याचे आढळून आले आहे.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की अनेकांच्या पायावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या नसा दिसू लागतात. याचे कारण दीर्घकाळ उभं राहणं किंवा चालणं असू शकतं. त्याला वॅरिकास व्हेन्स म्हणतात. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा, पायात जळजळ, पेटके, पायात जडपणा, शिरेच्या वरच्या भागात खाज सुटणे, इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.

लक्षणे

 • नसांमध्ये वेदना आणि सूज.
 • त्वचेच्या जखमा सहज बऱ्या होत नाहीत.
 • कोरडी आणि खवलेयुक्त त्वचा.
 • पाय किंवा घोट्याला सूज येणे.
 • रात्री पाय किंवा इतर भागात पेटके किंवा वेदना.
 • शिरांभोवतीची त्वचा घट्ट होणे आणि कडक होणे.

  काळजी
 • जीवनशैलीत बदल करणे
 • वजन कमी करणे
 • आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे
 • पायाची हालचाल व व्यायाम करणे
 • एका जागी फार वेळ उभे राहणे टाळणे
 • धुम्रपान मद्यपान व्यसने टाळावित
 • उंच टाचेच्या चपलेचा नियमित वापर टाळावा
  टाइट जिन्सचा वापर टाळावा

Related Stories

मधुमेह निदानासाठी तपासण्या

Omkar B

वैद्यकशास्त्राचा चमत्कार – 10 वर्षांनी 78 वर्षीयाला मिळाली दृष्टी

Patil_p

हे गैरसमज जाणून घ्या

tarunbharat

जेवणानंतर चहा घेताय

Amit Kulkarni

लॉकडाउन काळात करा तीन सोपे व्यायम

Omkar B

टेनिस एल्बोवर उपचार

tarunbharat
error: Content is protected !!