प्रतिनिधी /तिसवाडी
मेरशी येथील मेरशी सांस्कृतिक ट्रस्टचे रविवार झालेल्या बैठकीत हेमंत गोलतकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जोगुसो नाईक यांनी अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव सूचवले तर विनोद नार्वेकर यांनी अनुमोदन केले.
पुढील तीन वर्षांकरीता निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष – बाळकृष्ण पै व अजित नाईक, सचिव – दामोदर केरकर, सहसचिव – प्रशांत वेंगुर्लेकर व विनोद नार्वेकर, खजिनदार – यशवंत दाभोलकर, सहखजिनदार – धाकटू वेंगुर्लेकर व अवधुत शिरोडकर. या बैठकीत ट्रस्टची स्वतःच्या मालकीची जागा असावी अशी सूचना करण्यात आली असता अध्यक्ष हेमंत गोलतकर यांनी नवीन जागा घेण्यास संमती दर्शविली. तसेच हेमंत गोलतकर यांनी ट्रस्टने एका नवीन नाटकाची निर्मिती करुन विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे सूचित केले. यंदा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. शेवटी खजिनदार यशवंत दाभोलकर यांनी आभार मानले.