वृत्तसंस्था/ मेलबर्न
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन लॅचलन हेन्डरसन हे आपले चेअरमनपद पुढील वर्षीच्या प्रारंभीच सोडणार असल्याची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला गेल्या 18 महिन्यांच्या कालावधीत चेअरमनपदासाठी चार जणांची नियुक्ती करावी लागली होती.
हेन्डरसन हे सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. आता ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नवे स्थान भूषवणार असल्याने त्यांनी आपल्या चेअरमनपदाचा त्याग करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाला कळवला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पुढील चेअरमनपदी न्यू साऊथवेल्सचे माजी प्रमुख मिकी बेअर्ड यांची नियुक्ती केली जाणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात बेअर्ड यांची या पदावर नियुक्ती केली जाईल. 2021 च्या ऑक्टोबरमध्ये इडिंग्ज यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर हेन्डरसन यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते.