Tarun Bharat

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हेपॅटायटिस बी लसीकरण

प्रतिनिधी /बेळगाव

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील युथ रेडक्रॉस विभाग, केएलई इस्पितळातील गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी विभागांच्यावतीने हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची तपासणी व हेपॅटायटिस बी लसीकरण अभियान राबविण्यात आले.

बुधवार दि. 17 व गुरुवार दि. 18 ऑगस्ट असे दोन दिवस चाललेल्या या अभियानाला कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार, उपअधीक्षक शहाबुद्दीन, एम. एच. खान, गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष हजारे, डॉ. चंद्र मेटगुड, डॉ. अविनाश कवी, डॉ. सौम्या आदींच्या उपस्थितीत रोपटय़ाला पाणी घालून चालना देण्यात आली.

हेपॅटायटिस बी हे सायलेन्ट किलर आहे. लसीकरणामुळे रोग थोपविता येतो. जागृतीअभावी लोक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच कारागृहात जागृती व लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी 578 कैद्यांची तपासणी करून त्यांना लस देण्यात आली. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले.   

Related Stories

कोगनोळीत अपघातात वृद्ध जागीच ठार

Patil_p

हिंडलगा-विजयनगर-लक्ष्मीनगर भागातील गटारी कामांना प्रारंभ

Amit Kulkarni

इमारत बांधकाम परवान्याचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Amit Kulkarni

मूक पदयात्रेने बलिदान मासची सांगता

Amit Kulkarni

गोगटे रेल्वे ओव्हरब्रिज येथील धोकादायक पथदीप

Patil_p

अखेर कल्लोळ बंधाऱयाच्या पुनर्निर्मितीला मंजुरी

Omkar B
error: Content is protected !!