बऱ्याच वेळेला अंडरआर्म्स काळे असल्यामुळे स्त्रियांना स्लीव्हलेस कपडे घालण्यास लाज वाटते. पण अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. आज आपण अंडरआर्म्सचे काळे डाग दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात हे सांगणार आहोत. जाणून घ्या…
एरंडेल तेलाचा वापर करून अंडरआर्म्सचा काळेपणा दूर केला जाऊ शकतो,अशावेळी एरंडेल तेलाने मसाज करा.असे केल्याने ही समस्या लवकर सुटू शकते.
हळदीची पेस्ट तयार करून अंडरआर्म्सवर लावा. ते सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने समस्या दूर होऊ शकते.
कोरफडीचे जेल रोज अंडरआर्म्सवर लावल्याने ही समस्या दूर होऊ शकते.
लिंबाचा रस वापरून काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येवरही मात करता येते. लिंबाच्या आत अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. अशावेळी लिंबाचे काही थेंब साखर आणि मध मिसळून ते मिश्रण प्रभावित भागावर लावा. त्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा. असे केल्याने समस्या दूर होऊ शकते.
(टीप – वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौन्दर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

