मुंबई
दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक दुचाकीच्या विश्वात नाव कमावणाऱया हिरो इलेक्ट्रिकने रेव्हफिनसोबत करार केला आहे. या अंतर्गत खरेदीदारांना वाहन घेण्यासाठी कर्जाची सुविधा दिली जाणार आहे. ग्राहकांना कर्ज देणारा रेव्हफिन हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. हिरो इलेक्ट्रिक रेव्हफिनच्या माध्यमातून इच्छुक दुचाकी खरेदीदारांना समान मासिक हप्त्यावर कर्ज उपलब्ध करणार आहे. पुढील 3 वर्षात अडीच लाख ग्राहकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे.