Tarun Bharat

हिरो मोटोकॉर्पची येणार इलेक्ट्रिक दुचाकी

Advertisements

मुंबई

 देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटो कॉर्पचे इलेक्ट्रिक दुचाकी सादर करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात कंपनीची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात दाखल होणार असल्याची माहिती आहे.

विदा ब्रँड अंतर्गत आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी पुढील महिन्यात 7 तारखेला बाजारात सादर करणार आहे, असे समजते. सदरचा सादरीकरणाचा कार्यक्रम हा जयपूर, राजस्थान येथे होणार असून विक्रेते, गुंतवणूकदार व जागतिक विक्रेते, पुरवठादार यांना याकरीता निमंत्रित केले आहे. यावर्षी मार्चमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी 760 कोटींच्या उभारणीची तयारी केली होती. विदा ब्रँड अंतर्गत कंपनी आगामी काळात आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी सादर करणार आहे. सदरची नवी दुचाकी ही जयपूरच्या संशोधन, विकास केंद्रात विकसित करण्यात आली आहे.

Related Stories

अशोक लेलँडच्या एकूण वाहन विक्रीत 51 टक्के वाढ

Amit Kulkarni

मर्सीडिझ-बेंझकडून किंमती वाढवण्याचे संकेत

Patil_p

रेनॉची नवी क्वॉड दाखल

Patil_p

टीव्हीएसची इटीजीसोबत भागीदारी

Amit Kulkarni

जेएलआरच्या नव्या गाडीचे बुकिंग सुरू

Patil_p

मारुतीच्या नव्या सेलेरियोचे बुकिंग सुरु

Patil_p
error: Content is protected !!