सदरचे मॉडेल लवकरच उतरणार भारतीय बाजारात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्प सुपर स्प्लेंडर 125 चे नवीन मॉडेल लवकरच भारतीय बाजारात सादर करण्यात येणार आहे. कंपनीने नवीन टीझर सादर केले आहे. यामध्ये नवीन मॉडेल संपूर्णपणे ब्लॅक फिनिशसोबतच येणार आहे. कंपनीने अगोदरपासून 100 सीसी स्प्लेंडर प्लसचे एक ऑल ब्लॅक व्हर्जन अगोदरच सादर केले आहे. ज्यामध्ये इंधन टँक आणि साइड पॅनेलवर हिरो व स्प्लेंडर प्लस याचा लोगोसह ब्लॅक बेस पेंट मिळणार आहे.
सुपर स्प्लेंडर 125 सोबत नवीन मॉडेलमध्ये बीएस6 वाला 124.7 सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन मिळणार आहे. सुपर स्प्लेंडर 125 चे नवीन मॉडेल हे लवकरच भारतीय बाजारात येणार असल्याचे संकेत आहेत. कारण कंपनीला फेस्टिव्हल सीझनच्या अगोदर यांचे सादरीकरण करावयाचे असल्याची माहिती आहे.
अन्य बाबी
w हिरो सुपर स्प्लेंडरवर दोन मॉडेल-डिस्क व ड्रम मिळणार
w अंदाजे गाडीची किमत 81,100 रुपये इतकी एक्स शोरुम राहण्याची शक्यता
w जून 2022 मध्ये हिरोच्या दुचाकींची विक्री 3.35 टक्क्यांनी वधारली
w पॅशन एक्सटेक 110 आणि एक्सप्लस 200 4थी रॅली आवृत्ती सादर