Tarun Bharat

न्हावाशेवा बंदरावर 1725 कोटींचे हेरॉईन जप्त

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Heroin worth 1725 crore seized at Nhavasheva port मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर जवळपास 22 टन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 1725 कोटी रुपये आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दिल्लीच्या कालिंदी कुंज परिसरातून पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अफगाणी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यावेळी ग्रेटर नोएडा आणि लखनौमधून 1200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर आणखी काही कंटेनरमध्ये हेरॉईन असल्याचे समोर आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बंदरावर छापा टाकला. त्यावेळी एका कंटेनरमध्ये जवळपास 22 टन हेरॉईन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 1725 रुपये आहे. हे ड्रग्ज दुबईतून आल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : पत्राचाळ प्रकरणाला नवे वळण, राऊतांनी बेहिशेबी पैसा चित्रपट, मद्य कंपनीत गुंतवला

Related Stories

सारी व कोविडबाधित ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

Archana Banage

उद्या निवडणूक घेतल्या तरी भाजपचा विजय निश्चित- बावनकुळे

Archana Banage

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही आता 30 मिनिटे ऑनलाईन शिक्षण; सुधारित वेळापत्रक जाहीर

Tousif Mujawar

पावसाळ्यात कास पुलावर वाहतुक होणार ठप्प ?

Patil_p

राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

datta jadhav

शेतजमिनीवरुन सावत्र भावाकडून बहिणीस मारहाण

Patil_p