अहमदाबाद
गुजरातच्या एटीएसला मोठे यश मिळाले आहे. कच्छ जिल्हय़ातील मुंद्रा बंदरानजीक एका कंटेनरमधून सुमारे 70 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 350 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएसने हेरॉइन जप्त करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. शिपिंग कंटेनर काही दिवसांपूर्वी विदेशातून दाखल झाला होता. डीआरआयने मागील वर्षी या बंदरावरून सुमारे 3 हजार किलो वजनाचे हेरॉइन जप्त केले होते.