वृत्तसंस्था/ लंडन (ब्रिटन)
इंग्लीश कौंटी स्पर्धेतील नॉर्दम्पटनशायर क्रिकेट क्लब बरोबर रविवारी येथे झालेल्या दुसऱया सरावाच्या सामन्यात भारताने 10 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय संघातील हर्षल पटेलची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 20 षटकांत 8 बाद 149 धावा जमविल्या. नॉर्दम्पटनशायरच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचे संजु सॅमसन, राहुल त्रिपाठी आणि सुर्यकुमार यादव हे केवळ 8 धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतर हर्षल पटेलने 36 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावांची खेळी केल्याने भारताला 149 धावापर्यंत मजल मारता आली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नॉर्दम्पटनशायरचा डाव 19.3 षटकांत 139 धावांत आटोपला. पॉवरप्लेमध्ये भारताने 4 गडी बाद केले. भारतातर्फे अर्षदीप सिंग, प्रसिद्धकृष्णा, आवेश खान, हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नॉर्दम्पटनशायरने आपले पहिले पाच फलंदाज 54 धावांत जमविले. या संघातर्फे सैफ जेबने 33, इमेलो गेने 22 आणि नाथन ब्युकने 18 धावा जमविल्या.