Tarun Bharat

सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनतर सदावर्ते यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च नायल्यात (Mumbai high court) धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने सदावर्ते यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात हायकोर्टाने सदावर्ते यांचा अटकपूर्व जामीन मंजूर (Pre-arrest bail) केला आहे.

दरम्यान, कोल्हापूर पाठोपाठ पुणे येथेही गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यांनतर सदावर्ते यांच्या अडचणी पुन्हा वाढवाढल्या होत्या. त्यामुळे सदावर्ते यांनी पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. आज न्यायालयात सुनावणी झाली असता हायकोर्टाने सदावर्ते यांना पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूर कोर्टात दाखल झाले होते. २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला आहे. मात्र, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना करण्यात आले आहे.

Related Stories

शेतकरी ‘आत्मनिर्भर भारता’चा आधार

datta jadhav

राज्यातील नेत्यांनी थकवलंय लाखोंचं वीजबिल, उर्जा विभागाकडून यादी जाहीर

datta jadhav

कोल्हापूर महापालिकेला मिळणार पर्मनंट जलअभियंता, आरोग्य अधिकारी

Archana Banage

गुजरातमध्ये लाऊडस्पीकरवर आरती केल्याने व्यक्तीची हत्या

Archana Banage

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील आरोग्य सेविका कोरोनाबाधित

Archana Banage

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Tousif Mujawar