Tarun Bharat

उच्च न्यायालयाचा इम्रान खानना दिलासा

उच्च न्यायालयाची अटक वॉरंटला स्थगिती

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला. तोशाखाना प्रकरणी त्यांच्याविरोधातील अटक वॉरंटला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. इम्रान यांनी अटक वॉरंट रद्द करण्यासाठी बुधवारी याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीला तोशाखाना प्रकरणाच्या संदर्भात इस्लामाबादमधील सत्र न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंट अंतर्गत त्यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस इम्रान खानच्या घरी पोहोचले होते. तोशाखाना प्रकरणातील अनेक सुनावणीत इम्रान खान न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आले होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पोलीस आणि रेंजर्सची टीम इम्रान खान यांच्या लाहोरस्थित जमान पार्क येथील निवासस्थानावरून 22 तासांनंतर परतली होती. पोलिसांनी इम्रान खान यांना अटक न करण्यामागील कारण स्पष्ट करताना लाहोरमध्ये होणाऱया क्रिकेट सामन्यांचे निमित्त पुढे केले होते. इम्रान खान यांना अटक झाल्यास शहरात अराजकता आणि हिंसाचाराचे वातावरण कायम राहिल्यास पाकिस्तानी आणि परदेशी खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आम्ही कारवाई तात्पुरती मागे घेत आहोत, असे लाहोर पोलिसांच्या एका अधिकाऱयाने सांगितले. तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना अटक होणार होती. इस्लामाबाद सत्र न्यायालयाने त्यांना 29 मार्चपर्यंत अटक करण्याचे आदेश दिले होते.

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांसमीप

datta jadhav

लस उपलब्ध झाल्यास देशवासियांना मोफत डोस; ‘या’ देशाने केली घोषणा

datta jadhav

अध्यक्षीय कार्यालयात पोहोचले होते रशियाचे सैनिक

Patil_p

केरळमधील 14 जिहादी ISKP मध्ये सामील

datta jadhav

युक्रेनवर रशियाने डागली 33 क्षेपणास्त्र

Patil_p

प्लास्टिक सर्जरीद्वारे गालांवरील चरबी हटविण्याचा ट्रेंड

Patil_p