Tarun Bharat

जम्मू-काश्मीरसंबंधी उच्चस्तरीय बैठक

टार्गेट किलिंग, ड्रोनच्या घुसखोरीसह अनेक मुद्दय़ांवर झाली चर्चा

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षास्थितीवरून केंद्रीय गृह मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक मंगळवारी पार पडली आहे. केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ल्या यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे. या बैठकीत गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, इंटेलिजेन्स ब्युरोचे संचालक तपन डेका आणि एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांच्यासह अनेक अधिकाऱयांनी भाग घेतला आहे.

गृह मंत्रालयात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया, ड्रोनची घुसखोरी, टार्गेटेड किलिंग अणि काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांसंबंधी चर्चा करण्यात आली आहे. एनआयए, सीआरपीएफ, बीएसएफ, जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि रॉचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

56 कर्मचाऱयांना धमकीचे पत्र

द रेजिस्टेंश प्रंट या दहशतवादी संघटनेने श्रीनगर जिल्हय़ातील शिक्षण विभागाच्या 56 कर्मचाऱयांना उद्देशून धमकीयुक्त पत्र जारी केले आहे. काश्मिरी पंडितांच्या संघटनांनी या धमकीला गंभीर मानत याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडित असलेल्या 56 कर्मचाऱयांची ‘हिट लिस्ट’ जारी करण्यात आल्याने खोऱयात काम करणाऱया काश्मिरी पंडित समुदायात भीतीचे वातावरण आहे. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेज अंतर्गत काश्मिरी पंडितांना नोकरी प्रदान करण्यात आली होती. दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले पाहता खोऱयात काम करणारे अनेक काश्मिरी पंडित कर्मचारी जम्मूत स्थलांतरित झाले आहेत.

काश्मिरी पंडितांच्या हत्येचे सत्र

जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडच्या महिन्यांमध्ये अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. यात नागरिक अन् सुरक्षा कर्मचाऱयांवरील हल्ले तसेच सीमेपलिकडून होणाऱया घुसखोरीचे प्रयत्न इत्यादी सामील आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हद्दपार करण्यात आल्यापासून जुलै 2022 पर्यंत 5 काश्मिरी पंडित आणि 16 शिख तसेच हिंदूंची जम्मू-काश्मीरमध्ये हत्या करण्यात आली आहे.

Related Stories

भारतात मागील 24 तासात 70,589 नवे कोरोना रुग्ण; 776 मृत्यू

datta jadhav

महिलाविरोधी गुन्हय़ांच्या तक्रारींमध्ये वाढ

Patil_p

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

Omkar B

छत्तीसगडमध्ये मदतनिधीची घोषणा

Patil_p

देशात 54,366 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

दुसरी कसोटी अनिर्णित अवस्थेकडे

Patil_p