नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑगस्ट 2022 हा महिना नव्या रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विक्रमी ठरला आहे. या महिन्यात गेल्या 14 वर्षांमध्ये ऑगस्ट महिन्यात निर्माण झाले नव्हते, तेव्हढे रोजगार निर्माण झाले आहेत, अशी माहिती एस अँड पी ग्लोबल इंडिया सव्हिसेसने दिली आहे. गेल्या 11 महिन्यांमध्ये रोजगारनिर्मिती काहीशी मंद होती. मात्र, आता झपाटय़ाने परिस्थितीत परिवर्तन होताना दिसत आहे.
ऑगस्ट 2022 या महिन्यात रोजगारनिर्मितीचा पीएमआय 55.5 वरुन 57.2 वर पोहचलेला आहे. इतकी वाढ एका महिन्यात गेल्या 14 वर्षांमध्ये झाली नव्हती, असे दिसून आले आहे. विकासाला अनुकूल वातावरण, व्यवसाय सुलभता धोरणाचा प्रभाव आणि वाढती विदेशी गुंतवणूक यामुळे रोजगारनिर्मिती मोठय़ा प्रमाणात झाली. या महिन्यात प्रतिदिन जवळपास 1 लाख असे साधारणतः 25 लाख नवे रोजगार निर्माण झाल्याचे प्रतिपादन एस अँड पी ने केले आहे.