Controversy On Hijab In Iran : हिजाब सक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अटक केली होती. तिचा पोलीस कोठडीत धक्कादायक मृत्यू झाला. यानंतर राजधानी तेहरान आणि मशहादसह अन्य शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्येही सरकारचा निषेध केला जात आहे. या आंदोलनात अनेक ठिकाणी महिलांनी केस कापून हिजाब जाळलं आहे. त्यामुळं आता महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
इराणमध्ये १९७९ साली झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर देशात बाहेर फिरताना महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली होती. डोकं, केस आणि मान झाकली जाईल, अशा पद्धतीचा हिजाब महिलांनी घालावा, असा नियमच इराणमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर आता महिलांनी हिजाबविरोधात आंदोलन सुरू केल्यामुळं राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यातच आंदोलनकर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याने वातावरण तापलं आहे.
इराणी पत्रकार मसिह अलीनेजाद यांच ट्विट
इराणी पत्रकार आणि कार्यकर्त्या मसिह अलीनेजाद यांनी ट्विट करत निषेध नोंदवला आहे. ही इराणमधील महिला क्रांती आहे. हिजाब नीट न परिधान केल्यामुळे हिजाब पोलिसांनी # MahsaAminiची हत्या केली. प्रत्युत्तर म्हणून इराणी महिलांनी त्यांचे हिजाब व्यवस्थित काढले आहेत. ती आमच्यासाठी मेली नाही. ती लिंगभेदाविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक बनत आहे असे ही ती म्हणाली आहे.


previous post