Tarun Bharat

MCD नंतर, हिमाचल देखील भाजपच्या हातून निसटले..!

Himahal Pradesh Election result 2022: गेल्या 48 तासांत भाजपने दोन ठिकाणी सत्ता गमावली आहे. बुधवारी दिल्लीत १५ वर्षांनंतर भाजप एमसीडीमधून बाहेर पडली, तर आज हिमाचल प्रदेश भाजपच्या हातातून निसटताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्यात भाजपला बंपर बहुमताचे संकेत मिळत असले तरी इतर निवडणुकीच्या निकालांनी भाजपची निराशा केली आहे. भाजप सलग दुसऱ्या दिवशीही सत्ता गमावत असल्याचे दिसत आहे. बुधवारी भाजपने 15 वर्षांनंतर दिल्लीतील एमसीडीची सत्ता गमावली, त्यानंतर गुरुवारी म्हणजेच आज भाजपला खिशातून दुसरे राज्य गमवावे लागले.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची पिछेहाट दिसून येत आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत भाजपला केवळ 26 तर काँग्रेसला 39 जागा मिळताना दिसत आहेत. येथे अपक्षांना 3 जागा मिळताना दिसत आहेत. तसेच आपला खातेही उघडता आले नाही. 68 सदस्यीय हिमाचल विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.

Related Stories

कॅप्टन आज करणार राजकीय ‘धमाका’

Patil_p

सिकंदर, महेंद्र गायकवाड, सदगीर आणि शिवराज राक्षेची अंतिम फेरीत धडक

datta jadhav

अमित शाह घेणार लालबागच्या राजाचे दर्शन; मराठीतून केले ट्वीट

Archana Banage

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

datta jadhav

गायींच्या देखभालीसाठी खर्च करणार ः केजरीवाल

Patil_p

मध्यप्रदेशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

Patil_p