क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर बसवणगुडी येथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया निमंत्रितांच्या खेलो इंडिया ज्युनियर महिलांच्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या हिमानी जाधवने 2 रौप्यपदके पटकाविले. व तिची त्रिवेंद्रम, केरळ येथे होणाऱया राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेंगळूर येथे झालेल्या खेलो इंडिया ज्युनियर महिलांच्या स्पर्धेत 10 मी. बॅकस्ट्रोक व 200 मी. बटरफ्लाय या प्रकारात हिमानीने रौप्य तर 200 मी. बटरफ्लाय स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला. हिमानी जाधव ही जेएनएमसीच्या जलतरण तलावात सराव करीत असून, तिला अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितेश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिला केएलईचे उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, अविनाश पोतदार, माखी कापाडीया, लता कित्तूर, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने यांचे प्रोत्साहन लाभत आहे.