Tarun Bharat

नगर राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे हिंदी दिवस-पारितोषिक वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

नगर राजभाषा अंमलबजावणी समिती (नराकास) (बँक आणि विमा), बेळगाव आणि युनियन बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिन आणि पारितोषिक वितरण समारंभ लॉर्ड्स इको इन बेळगाव येथे आयोजित केला होता. दीपप्रज्वलन व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुंबई, राजभाषा विभागाचे सेवानिवृत्त साहाय्यक संचालक डॉ. जयशंकर यादव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय मोहन एम. पाटील आणि बँक ऑफ इंडियाचे साहाय्यक महाव्यवस्थापक अरुण झा उपस्थित होते.

नराकासचे अध्यक्ष डॉ. प्रकाश टी. यांनी आपल्या भाषणात कार्यालयाच्या अंतर्गत कामकाजात हिंदी आणि इतर भारतीय भाषांचा अधिकाधिक वापर करण्यात आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, अशी विनंती
केली.

येत्या काळात आपल्या भाषेचा वापर वाढवून राष्ट्राच्या विकासाला हातभार लावू, अशी शपथ घेऊया.

प्रमुख पाहुणे अरुण झा म्हणाले, हिंदी चित्रपटानंतर भाषेच्या संवर्धनात सर्वात मोठे योगदान कोणाचे असेल तर ते बँकेचे कर्मचारी आहेत. जे त्यांच्या बदलीच्या वेळी वेगवेगळय़ा भाषा शिकतात आणि त्यांचा प्रचार करतात. हिंदी भाषा ही इतर कोणत्याही भारतीय भाषेची स्पर्धक नसून सहयोगी आहे. प्रत्येक भारतीयाने भारतातील सर्व भाषांबद्दल आदराची भावना बाळगली पाहिजे आणि परस्पर सहकार्याने सहअस्तित्व राखून ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगितले.

विविध पुरस्कारांचे वितरण

यानंतर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी नराकासचा सर्वोत्कृष्ट अधिकृत भाषेच्या अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात आले. मोठय़ा प्रादेशिक कार्यालय गटात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, बेळगावला प्रथम पारितोषिक देण्यात आले. कॅनरा बँक, क्षेत्रीय कार्यालय, बेळगावला द्वितीय पारितोषिक मिळाले. मोठय़ा शाखा गटात बँक ऑफ इंडिया, बेळगावला प्रथम, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला द्वितीय आणि युको बँक, बेळगावला तृतीय पारितोषिक मिळाले. यानंतर राजभाषा शिल्ड, वैयक्तिक पारितोषिके आणि हिंदी पखवाडा अंतर्गत आयोजित स्पर्धांची एकूण 85 पारितोषिके वितरण करण्यात आली.

यावेळी ‘नॉन परफॉर्मिंग असेट्स  (एनपीए) समस्या आणि उपाय’ या विषयावरील संदर्भ साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. सर्व पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Stories

रेशनकार्ड कामात सर्व्हरडाऊनची समस्या

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील टॅगिंगला सुरुवात

Patil_p

आरटीओ कार्यालयात ऑनलाईन प्रशिक्षण

Amit Kulkarni

आंबेवाडीला जोडणाऱया संपर्क रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

कर्नाटक: कोरोना मृत्यू कमी करण्यावर लक्ष

Archana Banage

मंगळवारीही बाजार सुरू

Patil_p