Tarun Bharat

हिंदू दलित पतीचे मुस्लीमांकडून ‘ऑनरकिलींग’

Advertisements

हैदराबाद / वृत्तसंस्था

मुस्लीम तरुणीशी विवाह केलेल्या एका हिंदू दलित तरुणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार गुरुवारी घडला. या भीषण हत्येचे व्हिडीओ चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱयात झाले असून ते समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. नागराजू नामक हा तरुण आपल्या पत्नीसह मोटरबाईक वरुन जात असताना त्याला दोघांनी आडवून त्याच्यावर रॉड आणि चॉपरने हल्ला चढवला. त्याला चाकूने भोसकण्यात आले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.

नागराजू आणि अश्नीन सुलताना यांचा विवाह 31 जानेवारी 2022 या दिवशी येथील आर्यसमाज मंदिरात झाला होता. तो या युवतीच्या माहेरच्यांना पसंत नव्हता. नागराजू हा एका कार शोरुममध्ये सेल्समन होता. त्याच्यावर त्याच्या पत्नीच्या भावाने आणि भावाच्या मेहुण्याने हल्ला करुन त्याची हत्या केली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. या हत्येच्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

हत्येचे तीव्र पडसाद  अश्नीन हिने लग्नानंतर हिंदू धर्म स्वीकारत आपले नाव पल्लवी असे ठेवून घेतले होते. हे ऑनरकिलींग प्रकरण चांगलेच तापणार अशी चिन्हे आहेत. हैदराबाद येथील अनेक हिंदू संघटनांनी या हत्येचा रस्त्यावर उतरुन निषेध केला असून तेलंगणातील भाजप आमदार राजा सिंग यांनी ही हत्या केवळ युवतीच्या नातेवाईकांनी केली आहे की त्यामागे काही जात्यंध मुस्लीम संघटनांचे कारस्थान आहे, याचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. हिंदू संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली.

Related Stories

दोन खलिस्तानवाद्यांची संपत्ती होणार जप्त

Patil_p

हिंदू व्यक्तीच्या निर्घृण हत्याप्रकरणी दोघांना अटक

Patil_p

केंद्राची सवलत योजना ‘सर्वोच्च’ला मान्य

Omkar B

मायावती लढविणार नाहीत निवडणूक

Patil_p

ट्विटरच्या सहसंस्थापकांचं पराग अग्रवालांविषयी मोठं विधान

Archana Banage

देशात आजपासून पारदर्शक करप्रणाली लागू

datta jadhav
error: Content is protected !!