आयसीएफएआय बिझनेस स्कूलमधील प्रकार, आरोपींना अटक
वृत्तसंस्था/ हैद्राबाद
येथील आयसीएफएआय बिझनेस स्कूल नामक संस्थेमध्ये एका हिंदू विद्यार्थ्यावर मुस्लीम ज्ये÷ विद्यार्थ्यांनी अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. हिमांक बन्सल असे या हिंदू विद्यार्थ्याचे नाव आहे. काही मुस्लीम विद्यार्थ्यांनी त्याच्या खोलीत शिरून त्याला बेदम मारहाण केली. तसेच अल्ला हू अकबर म्हणण्याची सक्ती त्याच्यावर केली. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे विद्यार्थीवर्गात तसेच पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हिमांक बन्सल याने महम्मद पैगंबर यांच्यासंबंधी काही टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. त्याने खरोखरच अशी काही टिप्पणी केली होती काय? यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तरीही त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
आरोपीला अटक
व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर संस्थेच्या प्रशासनाला जाग आली असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बन्सल यानेही पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली असून एफआयआर दाखल केलेला आहे. संस्थेला ही घटना माहीत असूनही वेळेवर कारवाई न केल्याबद्दल संस्थाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक हिंदू संघटनांनी तसेच पालकांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ज्ये÷ विद्यार्थ्याला अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
धक्कादायक आणि घ्रृणास्पद
अफवांवर विश्वास ठेवून एका विद्यार्थ्याला मारहाण करून त्याला धार्मिक घोषणा द्यावयास लावणे हा प्रकार धक्कादायक आणि घ्रृणास्पद असल्याची प्रतिक्रिया तेलंगणातील भाजप कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. असेच वातावरण राहिल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटल्यावाचून राहणार नाही. राज्य सरकार धार्मिक उन्मादी लोकांना पाठीशी घालत आहे, अशी टीका करण्यात आली.