नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान कॉपरने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 74.20 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे.
हिंदुस्थान कॉपरने गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या निव्वळ नफ्याच्या 30.01 टक्के म्हणून 2021-22 साठी 74.20 कोटी रुपयांचा लाभांश सरकारला सादर केला आहे, अशी माहिती खाण मंत्रालयाने दिली आहे.
याशिवाय सर्व भागधारकांना एकूण 112.17 कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला आहे. यावेळी कंपनीसाठी प्रति शेअर लाभांश हा आतापर्यंतचा सर्वाधिक होता. हिंदुस्थान कॉपरने गेल्या आर्थिक वर्षात 1,812 कोटी रुपयांची सर्वाधिक उलाढाल नोंदवली. या कालावधीत कंपनीचा कर पूर्व नफा 381.76 कोटी रुपये होता. कंपनी सध्या वार्षिक 1.22 लाख टन खनिज उत्पादन क्षमता साध्य करण्यासाठी आपली खाण विस्तार योजना राबवत आहे.