सदरचे ध्येय 2028-29 पर्यंत प्राप्तीचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी मालकीची हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीने तिच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात 2028-29 पर्यंत तांबे धातूचे उत्पादन वार्षिक 1.22 कोटी टनांपर्यंत वाढवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. अशी माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचे तांबे धातूचे उत्पादन 35.7 लाख टन होते. कंपनीने सांगितले की, एचसीएलने पुढील सात ते आठ वर्षांमध्ये पहिल्या टप्प्यात 1.22 कोटी टन प्रतिवर्षी उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनीची उलाढाल 2021-22 मध्ये 2.92 टक्क्यांनी वाढून 1,812.21 कोटी रुपये झाली आहे. या मागील आर्थिक वर्षात ही उलाढाल 1,760.84 कोटी रुपये होती. ही उत्पादन वाढ सध्याच्या स्थितीत महत्वाची मानण्यात येत आहे.
बंद खाणी पुन्हा उघडण्यासाठी प्रयत्न करणार
बंद खाणी पुन्हा उघडण्यासाठी, भारतीय कॉपर कॉम्प्लेक्सच्या सिंहभूम कॉपर बेल्टमध्ये नवीन भूमिगत खाण विकसित करण्यासाठी कंपनीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.