ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (hiraben modi) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी हिराबेन यांची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी त्यांच्या आईशेजारी बसून 45 मिनिटं घालवली. तसेच तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले होते. हिराबेन यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा 100 वा वाढदिवसही मोदींनी साजरा केला होता. हिराबेन यांना नेमकं काय झालं आहे, हे अद्याप समजू शकले नाही.