Tarun Bharat

एचपीसीएलच्या सहकार्याने हिरोमोटोकॉर्पची चार्जिंग स्टेशन्स

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हिरोमोटोकॉर्प यांनी इलेक्ट्रिक दुचाकींसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याकरीता सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एचपीसीएल) सहकार्य घेण्याचे ठरवले आहे.

सदरच्या उपक्रमांतर्गत दोन्ही कंपन्या प्रथम एचपीसीएलच्या पेट्रोलपंपांवर चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणार आहेत. या सुविधेचा वापर जास्तीत जास्त दुचाकीस्वारांना व्हावा यासाठी नियोजन केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात निवडक शहरांमध्ये केंद्रे उभारणार

हिरो मोटोकॉर्पने निवेदनात सांगितले की, पहिल्या टप्प्यात काही निवडक शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. त्यानंतर त्याचा विस्तार इतर शहरांमध्ये टप्प्याटप्याने केला जाईल. देशभरात जास्तीत जास्त ईव्ही चार्जिंग स्टेशन्स बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

 हिरोमोटो कॉर्पचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल म्हणाले, ‘आमचा विश्वास आहे की इलेक्ट्रिक वाहनांचा सहज आणि जलद अवलंब करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ग्राहकांना चार्जिंग स्टेशनसारख्या सुविधा सहज आणि सोयीस्करपणे उपलब्ध होतील. त्यासाठीच आगामी काळात चार्जिंग स्टेशन्सची उभारणी लवकरात लवकर करणे आवश्यक असणार आहे.

Related Stories

रियलमी 7 5जी स्मार्टफोन लाँच

Omkar B

सेन्सेक्स घसरणीत; निफ्टी तेजीत

Patil_p

तत्वचिंतन फार्माला सेबीची मंजुरी

Patil_p

सेन्सेक्सची दुसऱया सत्रात 673 अंकांची झेप

Patil_p

सुरुवातीच्या तेजीनंतर बाजार घसरला

Patil_p

‘फोर्ड मोटार’ कोविड लढाईसाठी 50 लाख सर्जिकल मास्क देणार

Patil_p
error: Content is protected !!