Tarun Bharat

इतिहासकार डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांचे घर भग्नावस्थेत

प्रतिनिधी /मडगाव

महान भारतीय राष्ट्रवादी डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांनी 1861 ते 1869 या काळात पोर्तुगीज संसदेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. ते महान भारतीय राष्ट्रवादी होते. त्याचे कोलमोरोड – नावेली येथील वडिलोपार्जिक घर भग्नावस्थेत असून मोडकळीस आलेल्या घराला सरकारने योग्य न्याय द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांची गोव्यात स्मारके उभारण्यात आली तसेच रस्त्यांना त्यांचे नाव देण्यात आले. मंगळवारी त्यांची जयंती होती. पण, तिचा विसर सरकारला पडला. याबद्दल देखील नाराजीचा सूर व्यक्त झाला. डॉ. एफ. एल. गोम्स एक प्रति÷ित वक्ते, चिकित्सक, लेखक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय शास्त्रज्ञ होते. उदारमतवादी तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ते प्रशंसनीय होते.

योगायोगाने, 14 वर्षांपूर्वी, मडगाव नगरपालिकेने 1,143 चौरस मीटरच्या घराच्या प्रस्तावित संपादनासाठी अंदाजपत्रक तयार केले होते. ‘आम्हाला अजूनही वाटते की त्यांच्या वडिलोपार्जित घराचे जतन करणे आणि संग्रहालयाची स्थापना करणे हे केवळ त्यांच्या योगदानाला योग्य सन्मान देण्यासाठीच नव्हे तर वारसा स्थान म्हणून अधिसूचित पर्यटकांचे आकर्षण देखील ठरू शकेल. आम्हाला आशा आहे की सरकार या दिशेने आवश्यक पावले उचलेल असे मडगावचे माजी नगराध्यक्ष आणि शेडो काऊन्सिलचे अध्यक्ष सावियो कुतिन्हो म्हणाले.

Related Stories

भारतीय संस्कृतीची महती जागतिकस्तरावर पोहोचावी!

Amit Kulkarni

पॅटरिंग उद्योगासही प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सक्तीचे

Omkar B

तीन महिन्यांत खाण लिलाव

Amit Kulkarni

कुडचडे पालिकेची कचरावाहू वाहने गंजत पडून

Amit Kulkarni

रुग्णसंख्या पाच हजार पार, चार बळी

Amit Kulkarni

आज ठरणार लॉकडाऊन कालावधी

Omkar B