Tarun Bharat

बेंगळूरमध्ये पकडलेला संशयित हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काही दिवसंपूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केली होती. त्यानंतर जुनैद महंमद याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय 28, रा. किश्तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मीर येथे अटक करण्यात आल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला बेंगळूर येथून अटक करण्यात आली आहे. कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला पकडले.

बेंगळूर पोलिसांच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, आरोपी तालिब हुसैन याला रविवारी अटक करण्यात आली. हुसेन आपल्या पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता कारण सशस्त्र दल त्याचा शोध घेत होते. त्यामुळे तो बेंगळूरमध्ये लपून बसला होता.

हुसेनने बेंगळूरच्या श्रीरामपुरा येथील मशिदीत आश्रय घेतला होता. तो शुक्रवारच्या नमाजच्या वेळी वाद घालत असे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज हुसैनच्या अटकेची पुष्टी केली. ते म्हणाले की सहसा पोलिसांची नजर त्याच्यासारख्या लोकांवर असते. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांना पूर्ण मदत केली जाईल. याआधीही सिरसी आणि भटकळमध्ये अशा प्रकारच्या अटकेच्या घटना घडल्या होत्या.जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून कोणतीही मदत लागल्यास आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, असे ते म्हणाले.

आश्रय देणाऱ्यांची होणार चौकशी : अराग ज्ञानेंद्र
दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील एका संशयित दहशतवाद्याला बेंगळेर येथून अटक करण्यात आली आहे. राज्य पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शहरातील संशयित दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांचीही चौकशी सुरू आहे.

Related Stories

पंतप्रधान मोदींनी राजकारणाची संस्कृतीच बदलली !

Patil_p

अफगाणिस्तानात 4.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Patil_p

नाशिकमध्ये अपघातानंतर खासगी बस पेटली, 12 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून

Archana Banage

महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

‘या’ दिवशी होणार जेईई ॲडव्हान्सची परीक्षा : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Tousif Mujawar
error: Content is protected !!