Tarun Bharat

किसान सभा एक लाख गावांमध्ये करणार ध्वजारोहण

पुणे / प्रतिनिधी :

Hoisting of Kisan Sabha flag on November 15 आदिवासी शेतकऱ्यांचे नेते, क्रांतिकारी, हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी, 15 नोव्हेंबर रोजी किसान सभेच्या वतीने देशभर किसान सभेच्या झेंडय़ांचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या माहितीनुसार, बिरसा मुंडा जयंती दिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण करीत 15 नोव्हेंबर रोजी देशभर सुमारे एक लाख गावांत किसान सभेच्या झेंडय़ाचे ध्वजारोहण लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 13 ते 16 डिसेंबर 2022 या काळात त्रिचुर, केरळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या 35व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रचार कार्याची ही सुरुवात असेल.

बिरसा मुंडा यांनी भारताची जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आणि परकियांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. आज पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्या व कॉर्पोरेटधार्जिणे भाजप सरकार आदिवासींच्या जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण करत राष्ट्राची संपत्ती असलेले जल, जंगल, जमीन ओरबाडत आहे व आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनींवर मालकी नाकारून त्यांना जंगलातून बेदखल केले जात आहे. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवत पुन्हा संघर्ष करणे अटळ झाले आहे. किसान सभा त्यांचा हा संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही किसान सभेने म्हटले आहे.

अधिक वाचा : साखर कारखान्यांनी खासगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारल्यास कारवाई

Related Stories

तीन हजारांची लाच घेताना वडूजचा सर्कल ताब्यात

Patil_p

देवेंद्रजी मविआचा मोर्चा पॉवरफुल, ड्रोन शॉट काढून एकदा पाहाच

Archana Banage

वळीवडे गावातील पॉझिटिव्ह मयत रुग्ण महे गावात येऊन गेल्याने गाव तीन दिवस बंद

Archana Banage

पीक विम्याबाबत विमा कंपनी दोन दिवसात निर्णय घेणार : आ. राणाजगजितसिंह पाटील

Archana Banage

गवारेड्याच्या धडकेत निढोरीतील निवृत्त वनाधिकारी गंभीर जखमी

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,159 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar