hold customer meetings; Demand of Achra Trade Association to Electricity Board
शेतकरी व व्यावसायिक ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ग्राहक मेळावा घेण्याबाबत लेखी निवेदन देत आचरा व्यापारी संघटनेने आचरा विद्यूत मंडळ कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष वामन आचरेकर, मंदार सांबारी, जयप्रकाश परुळेकर, अर्जुन बापर्डेकर, निखिल ढेकणे, उदय घाडी, सिद्धार्थ कोळगे, मिनल कोदे, करीश्मा सक्रू यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे विद्यूत मंडळासंदर्भात शेतकरी,व्यावसायिक ग्राहकांना अनेक अडचणी येत आहेत. विज नियामख मंडळाच्या निर्देशानुसार दर महिना ग्राहक मेळावा घेणे आपणास बंधनकारक आहे. या दृष्टीने येत्या 15 नोव्हेबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ग्राहक मेळावा आयोजित करुन सहकार्य करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
आचरा / प्रतिनिधी