वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम (हॉलंड)
इंग्लंडविरुद्ध 17 जूनपासून सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शनिवारी हॉलंडच्या वनडे संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी हॉलंडचे नेतृत्व पीटर सिलेरकडे सोपविण्यात आले आहे.
या मालिकेसाठी हॉलंड संघामध्ये टॉम कूपरचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेकरिता हॉलंडच्या क्रिकेट संघटनेने 18 जणांचा संघ घोषित केला आहे. टॉम कूपर हा हॉलंडचा ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याने 41 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॉलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2016 नंतर त्याने अलिकडे आयर्लंडविरूद्ध टी-20 सामन्यांत सहभाग दर्शविला होता. या वनडे मालिकेसाठी हॉलंड संघामध्ये 19 वर्षीय फिरकी गोलंदाज टीम प्रिंगल या नवोदिताचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडे हॉलंड संघाला विंडीजविरूद्ध वनडे मालिका एकतर्फी गमवावी लागली होती.
हॉलंड वनडे संघ- पीटर सिलेर (कर्णधार), एडवर्डस्, मुस अहमद, शरीझ अहमद, लोगेन व्हॅन बेक, बासिव्हेन, टॉम कूपर, आर्यन दत्त, फ्लॉईड, किंगमा, क्लेसन, क्लेन, डिलेडी, एन तेजा, मॅक्स ओ दाऊद, प्रिंगल, विक्रमजीत सिंग आणि स्नेटर.