Tarun Bharat

कोरोनाच्या काळात तुळशीची बाजारपेठ विस्तारली

संजीव खाडे,कोल्हापूर
रक्त शुद्ध करणारी,ऑंटीसेप्टिक,प्रतिकारशक्ती वाढवणारी,हवा शुद्ध करणारी अशी बहुगुणी तुळस भारतीय आयुर्वेदात महत्त्वाची मानली जाते.कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जे उपाय योजले गेले त्यामध्ये तुळशीच्या अर्क असलेला काढा महत्त्वाचा ठरला.त्यानंतर आधीच महत्त्व असणाऱ्या तुळशीचे महत्व आणखीन वाढले.

विविध आयुर्वेदिक औषधात तुळशीचा वापर होतो.त्यामुळे आयुर्वेदिक औषध तयार करणाऱया कंपनी असो किंवा आयुर्वेदिक डॉक्टर असो,त्यांच्याकडून तुळशीची पावडर अथवा अर्क यांची मागणी असते.तुळशीचा इतर काही रोगांवर औषध म्हणून वापर होऊ शकतो का? यावरही संशोधन सुरू आहे. सध्या कोल्हापूर जिह्यात बऱयाच ठिकाणी तुळशीची लागवड केली जाते.काही प्रमाणात शेती सुरू झाली. मात्र त्याचे प्रमाण व्यापक नाही.

तामिळनाडूत तुळशीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. चेन्नईतून तुळशीची पावडर, तुळशीचा अर्क कोल्हापुरातील व्यापारी मागवत असतात. कोरोनाच्या संकटकाळात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जे उपाय योजले गेले. त्यामध्ये तुळशीपासून तयार केलेला काढा, तुळशीच्या अर्कापासून तयार करण्यात आलेला काढा यांचे रिझल्ट चांगले आले. रुग्णांना दिलासा मिळाला. त्यामुळे कोरोना काळापासून तुळस आणि तुळस विषयक इतर उत्पादनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीची बाजारपेठ विस्तारत आहे. विविध आयुर्वेदिक कंपन्या तुळशी पावडर तुळशी अर्काची निर्मिती करत आहेत. त्याचबरोबर इतर औषधातही तुळशीचा अर्क अथवा तुळशीची पावडर वापरली जात आहे.

तुळशीची पावडर आणि तुळशीचा अर्क यांची मागणी वाढू लागली आहे. तुळशीचा इतर औषधातील वापरही वाढू लागला आहे. भविष्यात तुळशीच्या उत्पादनांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात, कोल्हापूर जिह्यात तुळशीची शेती अथवा तुळशीचे मळे विकसित होणे गरजेचे आहे त्यातून आयुर्वेदाच्या प्रसाराबरोबरच आर्थिक उत्पन्नही मिळू शकते.

दीनानाथ माणगावे, प्रो. प्रा. माणगावे ब्रदर्स आयुर्वेदिक दुकान, गुजरी कॉर्नर, आझाद गल्ली, कोल्हापूर

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात ६४ रुग्णांची वाढ

Archana Banage

संभाजीराजे यांनी मानले फडणवीस यांचे आभार; मुंबईत घेतली भेट

Abhijeet Khandekar

ध्वनी प्रदूषण कमी झाले, वायू प्रदूषणाचे काय

Archana Banage

दख्खनचा राजा जोतिबा मालिका केदार विजय प्रमाणेच

Archana Banage

कोल्हापूर : सोनार्ली येथील दोघांचा अपघाती मृत्यू

Archana Banage

शहापूर पोलीस ठाण्याचा पोलिस नाईक पांडुरंग गुरव लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar