वेंगुर्ले /वार्ताहर-
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत आणि प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्या समन्वयातून गणेशचतुर्थी निमित्ताने दि. 2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा जिल्हयातील आठही तालुक्यात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचे, चलचित्राचे एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून तालुका समन्वयाच्या व्हॉटसअपच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवसापासून पाच दिवसांच्या गणपतीपासून पुढील कालावधीसाठी असलेल्या गणेशासाठी ते विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पाठवणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेतील प्रत्येक तालुक्यातील विजेत्या प्रथम पारितोषिक 11,111/-, द्वितीय पारितोषिक 7,777/-, तृतीय पारितोषिक 5,555/- उत्तेजनार्थ एकूण दोन क्रमांकास प्रत्येकी 1,000/- पारितोषिक आणि सर्व विजेत्यांना व प्रमाणपत्र अशी अशी बक्षीसे खास बक्षिस वितरणा कार्यक्रम आयोजीत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेसाठी तालुकानिहाय समन्वयक विधाता सावंत (वेंगुर्ले), मेघनाद धुरी (मालवण), अभय शिरसाठ (कुडाळ), प्रदीप मांजरेकर (कणकवली), वसंत नाटेकर (वैभववाडी), रविंद्र म्हापसेकर (सावंतवाडी), वासुदेव नाईक (दोडामार्ग), उल्हास मणचेकर (देवगड) हे आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक अरविंद मोंडकर-9892055820 यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक तालुक्याच्या समन्वयकाकडे नाव नोंदणी करा. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.