नवी दिल्ली
एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने आपल्या गृहकर्ज व्याजदरामध्ये नुकताच बदल केला असल्याची माहिती आहे. कंपनीने प्राईम लेंडिंग रेटमध्ये वाढ केली असल्याची माहिती आहे. सदरच्या गृहकर्जावरील व्याजदरामध्ये 35 बेसीस पॉइंटस्ने वाढ करण्यात आली आहे. सदरचा नवा दर हा 26 डिसेंबर 2022 पासून अंमलात येत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे नव्या वाढीनंतर 8.65 टक्के इतका व्याजदर असणार आहे. पंधरा कोटी रुपये पर्यंतच्या गृहकर्जासाठी ज्यांचा पेडिट स्कोर 800 इतका आहे त्यांना 8.30 टक्के दराने व्याजदर आकारला जाणार आहे. 5 कोटी पर्यंतच्या कर्जासाठी 8.40 टक्के इतका व्याजदर असेल.