Tarun Bharat

बजरंग पुनियाकडून गृहमंत्र्यांची सदिच्छा भेट

Advertisements

बेंगळूर / वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी हंगामाला 28 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी शनिवारी हॉकी इंडियाने 33 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा केली असून त्यामध्ये कर्णधार मनप्रितसिंग आणि अनुभवी व ज्ये÷ गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचा समावेश आहे.

निवड करण्यात आलेले संभाक्य हॉकीपटू बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये आगामी सराव प्रशिक्षण शिबिरासाठी सोमवारी दाखल होतील. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर भारताचे सामने न्यूझीलंड आणि स्पेन यांच्याबरोबर होणार आहेत. 28 ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडबरोबर तसेच उभय संघातील दुसरा सामना 4 नोव्हेंबरला होणार आहे.

भारत आणि जर्मनी यांच्यातील पहिला सामना 30 ऑक्टोबरला तर दुसरा सामना 6 नोव्हेंबरला खेळविला जाईल. संभाव्य हॉकीपटूंसाठी साई केंद्रामध्ये तीन आठवडय़ांचे सराव शिबिर आयोजित केले असून या शिबिरानंतर भारतीय हॉकी संघ 21 ऑक्टोबरला भुवनेश्वरमध्ये दाखल होईल.

संभाव्य हॉकीपटू – गोलरक्षक- पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाठक, पवन, बचावफळी- जर्मनप्रित सिंग, सुरेंद्र कुमार, हरमनप्रित सिंग, निलम झेस, अमित रोहिदास, जुगराज सिंग, मनदीप मोर, यशदीप सिवाच, दीपसेन तिर्की, संजय, मनजित, सुमित, मध्यफळी – मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागरप्रसाद, रवी चंद्र सिंग, समशेर सिंग, एन. शर्मा, राजकुमार पाल, पवन राजबर, आघाडी फळी- आकाशदीप सिंग, गुरुजंत सिंग, मनिंदर सिंग, मोहमद रहिल मुसेन, एस. किर्ती, मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रित सिंग आणि सुखजित सिंग.

Related Stories

रोमांचक सामन्यात द.आफ्रिकेची 4 धावांची बाजी

Patil_p

उरूग्वेला हरवून कोलंबिया उपांत्य फेरीत

Patil_p

जपानची ओसाका, बार्टी तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

अंकिता, प्रज्नेशची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Patil_p

पुरुष दुहेरीत भारताला दोन कांस्यपदके

Patil_p

विश्वचषकातील ‘तो’ पराभव आजही सल देणारा

Patil_p
error: Content is protected !!