Tarun Bharat

सेवा पोर्टलमध्ये गृह मंत्रालयाची वेबसाइट अग्रस्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या वेबसाइटची सेवा पुरविण्यासंबंधी आकलनात गृह मंत्रालयाची वेबसाइट पहिल्या स्थानावर आणि ‘डिजिटल पोलीस’ पोर्टल दुसऱया स्थानावर राहिले आहे. प्रशासकीय सुधार आणि लोकतक्रारी विभागाने (डीएआरपीजी) ‘नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज’   (नॅस्कॉम) आणि केपीएमजी कंपनीच्या सहकार्याद्वारे 2021 मध्ये ‘राष्ट्रीय ई-प्रशासकीय सेवा पुरवठा आकलन’ केले होते.

वेळावेळी घेतला जाणारा हा आढावा असून याचा उद्देश नागरिकांसाठी राज्ये, पेंशासित प्रदेश आणि केंद्र सरकारकडून सेवा उपलब्ध करण्याचा प्रकार अधिक प्रभावी करत त्यासाठी सुधारणा घडवून आणणे आहे. या आढाव्यानुसार केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या सेवा पोर्टलमध्ये गृह मंत्रालयाची वेबसाइट पहिल्या स्थानावर तर डिजिटल पोर्टल प्लॅटफॉर्म दुसऱया स्थानावर राहिले.

गृह मंत्रालयाच्या संदर्भात एनसीआरबीचे ‘डिजिटल पोलीस’ पोर्टल सेवा पोर्टल अंतर्गत आकलनासाठी निवडण्यात आले होते. याचबरोबर गृह मंत्रालयाच्या मुख्य वेबसाइटचे मूळ मंत्रालयाच्या पोर्टल अंतर्गत आकलन करण्यात आले.

Related Stories

अभिनेत्री कंगना रणावतला पुन्हा समन्स

Omkar B

RSS ची सहा कार्यालये बॉम्बने उडविण्याची धमकी

datta jadhav

रेल्वेत विविध पदांसाठी मेगा भरती

Tousif Mujawar

राजकीय अनुभवाचा श्रीधरन यांच्यात अभाव

Patil_p

12 वी उत्तीर्णांना ड्रोन पायलट होण्याची संधी

Patil_p

मजुरांना 15 दिवसांच्या आत घरी पोहोचवा : सुप्रीम कोर्ट

Tousif Mujawar